Member for

10 months 2 weeks

अशोक हांडे हे लोककळावंत, अभिनेता, गायक, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्श, नेपथ्यकार, निर्माते आणि लेखक आहेत. त्यांनी 'मंगलगाणी - दंगलगाणी'पासून 'मराठीबाणा'पर्यंत  तेहतीस वर्ष मराठी रंगभूमीवर लोककलेचे कार्यक्रम केले. त्यांचे शालेय शिक्षण गिरगावच्या चिकित्सक समूह शाळेत झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण 'रूपारेल महाविद्यालय' येथे झाले. त्यांनी महाविद्यालयात असताना एन एस एस कॅम्पमध्ये सहभाग घेऊन आदिवासी पाड्यात जाऊन संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी गोंधळी, वासुदेव, कोळीनृत्य, जोगवा, पोवाडा अशा सर्व लोककलेचे सादरीकरण केले आहे. त्यांनी 'साडेसातहजार स्टेज शो' केले आहेत. त्यांनी 1999 साली 'प्रजासत्ताक दिन' निमित्त 'आंबा' विषयावर सादर केलेल्या चित्ररथाचे दिग्दर्शन केले.

लेखकाचा दूरध्वनी

9821082804