Member for

6 months 3 weeks

सिसिलिया कार्व्हालो मराठी लेखिका आहेत. त्या वसईतील 'संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालया'च्या प्राचार्या आणि मराठीच्या अध्यापिका आहेत. त्या मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना पीएचडीसाठीचे मार्गदर्शन करतात. कार्व्हालो यांनी काव्याबरोबरच कथा, ललित, बालवाङ्मय, संकलन, लोकसाहित्य असे अनेक प्रकारचे साहित्य लिहिलेले आहे. त्यांची 'उन्मेश', 'अंतर्यामी', 'सूर्य किरणात आला', 'पंख', 'माणूस उकरून काढावा लागतोय' ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय त्यांनी 'त्यां प्रेमांजली' व 'मृद्‌वेणा' ही अनुवादित पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी उच्च माध्यमिक पाठ्यपुस्तक मंडळावर व बालभारती पाठ्यपुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाचा 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंचवीस पेक्षा अधिक पुरस्कारही मिळाले आहेत. त्या बेळगावात झालेल्या 'मंथन महिला साहित्य संमेलना'च्या अध्यक्ष होत्या.