Member for

1 year

सुरेश चव्हाण यांनी एम ए मराठीचे शिक्षण घेतले आहे. ते तीस वर्षे मुक्तपत्रकार आहेत. ते रिझर्व बँकेत कार्यरत होते. त्यांनी नाट्य प्रशिक्षण घेऊन 'आविष्कार नाट्यसंस्कृती' संस्थेत नाट्य समीक्षक म्हणून कार्य केले. त्यांनी 'इंडियन नशनल थीएटर'मध्ये 'नमन -खेळे' या लोककलेवर संशोधन करून नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन केले. त्यांनी 'देवदासी' विषयावर यल्लमाच्या दासी, निपाणीतील तंबाखूच्या वखारीतील स्त्रियांवर आधारित 'तंबाखू आणि विडीकामगार स्त्रिया', शिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक आणि शिक्षणतज्ञ पद्मश्री अनुताई वाघ यांच्यावर आधारित माहितीपट तयार केले आहेत. ते 'ग्रंथाली' आणि 'प्रभात चित्रमंडळ' या संस्थांशी सलंग्न आहेत.  

लेखकाचा दूरध्वनी

9867492406