Member for

5 months 2 weeks

नरेंद्र काळे यांचे बी एस सी पर्यंतचे शिक्षण झाले आहे. त्यांचा तरंग ऑडीओ-व्हिडीओ प्रोडक्ट कंपनीमार्फत कॅसेट तयार करण्याचा व्यवसाय होता. त्यांनी कॅसेट बंद झाल्यावर सीडीज बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी 'विच्छा माझी पुरी करा' हे दादा कोंडके यांचे पहिले लाईव्ह रेकॉर्डिंग केले. त्यांनी 'कट्यार काळजात घुसली', 'मी अत्रे बोलतोय' अशा अनेक नाटकांच्या सीडी रेकॉर्डिंग केल्या आहेत. ते जुन्या कॅसेटचे सीडीमध्ये रुपांतर करण्याचे काम करत आहेत. त्यांचे थिंक महाराष्ट्र डॉट कॉमवर 2010साली 'आचार्य अत्रे' आणि 'संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास' असे दोन सदर चालू होते. त्यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले पहिले हुतात्मा अनंत घोलपकर यांची कन्या सुलक्षणा सुधाकर गिरकर यांच्याविषयचा शोध घेतला होता. 

लेखकाचा दूरध्वनी

9822819709