Member for

3 years

पराग पोतदार हे पत्रकार. वास्तव्याने पुणेकर! त्यांनी 'पुणे विद्यापीठा'मधून पत्रकारिता विषयामध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्यांनी दैनिक 'लोकमत'मध्ये सोळा वर्षे काम केले. त्यांनी तेथे वरिष्ठ वृत्तसंपादक पदावर असताना स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला. पोतदार यांचे शिक्षण, समाज, संस्कृती आणि चित्रपट हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. ते त्याविषयी नियमित लेखन करतात. पोतदार पाणी आणि लहान मुले या विषयांसंबंधात सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. ते पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना संपादन, वृत्तांकन असे विषय शिकवतात. पोतदार यांनी पाच अनुवादित आणि एक चरित्रात्मक अशा सहा पुस्तकांचे लेखन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9850304154