Member for

3 years

मेजर सुभाष गावंड यांची 8 महार रेजिमेंट ही बटालियन. त्यांनी 1983 साली बावीस वर्षे नोकरी झाल्यावर सैन्यदलातून निवृत्ती घेतली, त्या दिवसापासून आजतागायत त्यांनी मुलामुलींना सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. ते ‘प्रभाव मिलिटरी अॅकॅडमी’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. मेजर गावंड यांच्याकडून प्रशिक्षण घेतलेले पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी सैन्यात भरती झाले आहेत. त्यांच्याबरोबर सैन्य व हवाई दलातले अधिकारीही घडवलेत. त्यांनी ‘मेजर मेमरीज’ (इंग्रजी) व लष्कराच्या भाकऱ्या चवदार (मराठी) ही पुस्तके लिहिली आहेत. मेजर गावंड यांना ठाणे भूषण पुरस्कार, ठाणे ज्येष्ठ रत्न पुरस्कार इत्यादींसारख्या वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9969717713