Member for

3 years 5 months

रवींद्र मालुंजकर नाशिक तालुक्यातील पळसे साखर कारखाना माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून १९९४ पासून कार्यरत आहेत. ते कवी आहेत आणि सूत्रसंचालक म्हणूनदेखील परिचित आहेत. त्‍यांनी ‘कविता जगवा, कविता जागवा’ यांसह विविध विषयांवर विद्यालये, महाविद्यालये येथे अभ्यासपूर्ण व्याख्याने दिलेली आहेत. त्‍यांनी पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या त्यांच्या शाळेतील बहि:शाल शिक्षण केंद्राचे सातत्याने दहा वर्षे केंद्रकार्यवाह म्हणून काम पाहिले आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे या अग्रगण्य संस्थेच्या उपक्रमशील नाशिकरोड शाखेचे कार्यवाह आहेत. त्‍यांचे काव्यसंग्रह आणि ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्यसंपदेस अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

लेखकाचा दूरध्वनी

9850866485/ 9423090526