Member for

4 years 8 months

महेश जोशी हे अहमदनगरचे राहणारे. त्‍यांनी एम. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. ते 1999 पासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. ते दैनिक 'लोकसत्‍ता' आणि दैनिक 'पुढारी' या वृत्‍तपत्रांचे कोपरगांव तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहतात. ते विविध वृत्‍तपत्रांत राजकीय, सामाजिक विषयावर लिखाण करत असतात. ते हवामान केंद्र जेऊरकुंभारी प्रश्‍नांसंदर्भात व महापुर आपत्‍ती व्यवस्थापन कार्यालय कोपरगांव जागेसंदर्भात शासनस्तरावर पंधरा वर्षांपासून प्रयत्‍नशील आहेत. 'असे होते कोपरगांव' या पुस्तकाच्‍या निर्मितीत त्‍यांचा सहभाग होेता. त्‍यांनी शासनाच्या तंटामुक्‍त गाव समितीवर पत्रकार प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यासंदर्भात त्‍यांनी अकोले, जळगाव, रावेर, धुळे आदि गावांत जाऊन तंटामुक्‍ती संदर्भात जनजागृती व मार्गदर्शन केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

भ्रमणध्वनी-94 23 16 71 77 लॅन्डलाईन टेलि फॅक्स-02423-223874