Member for
4 years 10 monthsपुरूषोत्तम क-हाडे हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर. ते सौरऊर्जेसाठी विविध पातळ्यांवर प्रयत्नशील असतात. क-हाडे यांनी वीज मंडळातील अधिकारी पदासोबत 'टाटा कन्सल्टींग इंजिनीयर'मध्ये जबाबदारीचे पद भूषवले. त्यांचे नोकरीच्या निमित्ताने सौदी अरेबिया, जपान, लाओस, भूतान, मलावी आणि इराणसारख्या देशांमध्ये वास्तव्य होते. इराणमध्ये घडलेली क्रांती त्यांनी स्वतः पाहिली. महाराष्ट्र ऊर्जेच्या पातळीवर स्वयंपूर्ण व्हावा या ध्यासापोटी त्यांनी महाराष्ट्रातील वीज परिस्थितीचा अभ्यास केला. सौरऊर्जा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी मुजुमदार या ज्येष्ठ तंत्रज्ञ मित्राच्या सहकार्याने 'ऊर्जा प्रबोधन' नावाचा गट तयार केला आहे. त्याद्वारे ते विविध ठिकाणी जाऊन लोकांचे ऊर्जाविषयक प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात. क-हाडे यांनी स्वानंदासाठी गीतेवर आधारित इंग्रजी प्रवचनांचा मराठी अनुवाद करून ठेवला आहे. त्यांनी संस्कृतमधून मराठीत भाषांतरीत केलेला अंबेजोगाई येथील 'श्री योगेश्वरी देवी' या देवस्थानाचा तीस ओव्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे.
9987041510