Member for

10 years 3 months

दीपा देशमुख या वाणिज्‍य शाखेतल्‍या पदवीधर. त्‍या प्रसिद्ध लेखक अच्‍युत गोडबोले यांच्‍या लेखनप्रक्रियेत सहाय्यक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी बालवाचकांसाठी प्रसिद्ध होणा-या 'चांदोबा' या मासिकाचा चार वर्षे मराठीतून अनुवाद केला. त्‍यांनी विविध वर्तमानपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमधून सातत्‍याने लेखन केले आहे. त्‍यांनी शिक्षण, पर्यावरण, अपंगत्‍व, महिला स्‍वयंसहायता गट अशा विविध विषयांवरील विशेषांकांचे संपादनही केले आहे. त्‍या मुलाखती घेणे, पुस्‍तक परिक्षण लिहीणे आण्‍ाि मुखपृष्‍ठ तयार करणे यांसारख्‍या विविध कामांत त्‍या गुंतलेल्‍या असतात. डॉ. अभय बंग यांच्‍या 'निर्माण' या उपक्रमात समन्‍वयक म्‍हणून तर 'प्रथम' संस्‍थेत कन्‍टेन्‍ट क्रिएटर-ट्रेनर म्‍हणून त्‍यांना कामाचा अनुभव आहे. त्‍यांनी ठाण्‍यातील मासवण भागात 'आदिवासी सहज शिक्षण परिवार' या संस्‍थेमार्फत शिक्षण विभाग प्रमुख म्‍हणून पंधरा गावांमध्‍ये काम केले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9545555540