Member for

7 years 11 months

श्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) मुंबई मुख्‍यालय येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत. पेटकर यांच्‍या प्रयतनांमुळे त्‍यांच्‍या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्‍कृष्‍ठ वीज केंद्राचा पुरस्‍कार मिळाला. त्‍यांना 'कल्याण रत्न' या पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले आहे.

लेखकाचा दूरध्वनी

9769213913