कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट
फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून दहा बळी...
‘बीपीसीएल रिफीयनरी’मध्ये बॉयलरचा स्फोट होऊन त्रेचाळीस जण गंभीर जखमी...
दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये आग लागून सत्तावीस लोक जळून खाक झाली...
पुण्याला साड्यांच्या गोडाऊनला आग लागून पाच जण मृत्यूमुखी व लाखो रुपयांचे नुकसान...
आग लागण्याच्या अपघातांच्या अशा पन्नास ते साठ घटना भारतात रोज घडत असतात. त्या घटनांच्या बातम्या आपण वाचत असतो, टीव्हीवर पाहत असतो, मनापासून हळहळतो आणि विसरून जातो. पण भाजण्याच्या अपघातांविषयी आणि भाजणाऱ्या व्यक्तींविषयी खूप गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे –