अकलुजमधील कुस्ती स्पर्धा


सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील अकलुजमध्ये त्रिमूर्ती केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. ती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, कर्मवीर नानासाहेब पाटील व धर्मवीर सदाशिव माने-पाटील या तीन बंधूंच्या स्मरणार्थ आहे.

Beyond Bollywood...


Beyond Bollywoodएक बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमधून काल-परवाच डोकावलेली पाहिली. 'डोकावली' म्हणण्याचं कारण असं, की ती रुढार्थानं ‘झळकली’ नव्हती. पुरवणीच्या कोपऱ्यातच होती - पण माझ्यासारख्या भारतीय मनांना तिचं कौतुक झळकल्यासारखं जाणवलं. बातमी होती वॉंशिंग्टन येथील जगप्रसिद्ध स्मिथसोनियन म्युझियमतर्फे सादर होऊ घातलेल्या एका आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाबद्दलची. प्रदर्शन उभं राहाणार आहे डिसेंबर २०१३ मध्ये. आणि त्याचं नाव आहे  "Beyond Bollywood : Indian Americans Shape the Nation".

भारतामधून अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर तिथे नव्याने रुजतानाचा भारतीयांचा प्रवास, विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील स्थलांतरित लोकांचे अनुभव आणि गेल्या शतकामध्ये त्या आव्हानांची बदलत गेलेली रूपं, आपला पाय अमेरिकेत रोवताना त्यांच्या भारतीय पावलांचे अमेरिकन संस्कृतीवर, राजकारणावर, समाजावर, कला-जीवनावर, शिक्षणपद्धतीवर,उद्योग-व्यवसायावर, विज्ञानावर, आध्यात्मिक विचारावर कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी उमटलेले ठसे - या सगळ्याचा आढावा त्या प्रदर्शनात घेतला जाणार आहे.

प्रदर्शनाची कल्पना शीर्षकापासूनच विचार करायला लावणारी आहे! "Beyond Bollywood…Indian Americans Shape the Nation."