अशोक महाराज शिंदे - व्‍यसनमुक्‍ती प्रवचनकार


सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील गुरसाळे येथील अशोक महाराज शिंदे हे व्यसनमुक्तीचा प्रचार करतात. ते किर्तनातून व्यसनमुक्तीचा संदेश तरुण पिढीला देत असतात. ते व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी गावोगावी फिरत असतात. त्यांनी कॉलेजला असताना सोलापूर विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये मिमिक्री या कलाप्रकारात प्रथम पारितोषिक मिळवले आहे. त्यांनी व्यसनमुक्ती संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून दोन वर्षें काम पाहिले आहे. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी 'मला मानधन म्हणून मिळणारे पाकिट मी कधीच उघडून बघत नाही’ असे सांगितले.

त्याच गावात खडानाथ महाराजांचे मंदिर असून तो त्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर उभा आहे.

अशोक महाराज शिंदे - 996035321/9096954483

- गणेश पोळ