महाराष्ट्रातील पहिला नवरात्रोत्सव


-navratrotsav-1926-prbhodhankar-thakreमुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा ते कल्याण-पालघरपर्यंतची मराठमोळी जनता स्वत:हून त्या नवरात्रौत्सवाच्या तयारीसाठी पुढे आली. तो महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव होय. नवरात्रोत्सव छत्रपती शिवरायांच्या काळापासून सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडागडांवर थाटामाटात साजरा होत असे. त्या प्रथेमध्ये पेशवाईच्या काळात खंड पडला असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते. त्यांनी दादरला नवरात्रौत्सव सुरू करण्यास चालना देऊन ती परंपरा पुनरुज्जीवित केली. त्या उत्सवाला आणखीही व्यापक पार्श्वभूमी होती -

नवदुर्गेची रूपे

प्रतिनिधी 28/04/2015

हिंदु संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्त्व आहे जसे नवविधा भक्ती, नवग्रह, नवरस, नवरात्री आणि नवदुर्गा! नवदुर्गा हे दुर्गा देवीचे नऊ अवतार. दुर्गेच्या नऊ रुपांतील शक्तीची उपासना यांतील प्रत्येक रूपाचे वैशिष्ट्य आहे. यांस मातृदेवतांचा समूह असेही म्हटले जाते. आगम ग्रंथामध्ये नवदुर्गेची नावे दिली आहेत.

1. शैलपुत्री - हिमालयाची कन्या. पूर्वजन्मीची दशपुत्री-सती.

2. ब्रम्हचारीणी – शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी.

3. चंद्रघण्टा/ चंडा – डोक्यावर घंटेप्रमाणे चंद्र धारण करणारी.

4. कुष्मांडा/कूष्मांडी – आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी.

5. स्कंदमाता – कार्तिकेयाची माता.

6. कात्यातयनी - असुरांच्या वधासाठी हाती चंद्रहास तलवार धारण करणारी काव्ययन ऋषींची पुत्री.

7. कालरात्री – रौद्र स्वरूप. उग्र संहारक अशी तामसी शक्ती असलेली - काळालाही भय निर्माण करणारी.

8. महागौरी – गौर वर्ण असलेली.

9. सिद्धिदात्री/ सिद्धदायिनी - आपल्या सर्व भक्तांना सिद्धी प्राप्त करून देणारी ती.

स्कंदयामलात व अग्नीपुराणात नवदुर्गेची पुढील नावे दिलेली आहेत. रुद्रचंडा, प्रचंडा, चंडोग्रा, चंडनायिका, चंडा, चंडवती, चंडरुपा, अतिचंडिका व उग्रचंडिका.