माझी कहाणी- पार्वतीबाई आठवले
30/05/2014
स्त्रियांची आत्मचरित्रे, आत्मकथने मराठीत बरीच आहेत. लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे’, रमाबाई रानडे यांचे ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’, सुनीताबाई देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी’ अशी काही लोकप्रिय आहेत.
असंच एक जुनं आत्मचरित्र म्हणजे पार्वतीबाई आठवले यांचं ‘माझी कहाणी’. पार्वतीबाई ह्या श्रीमती बाया कर्वे (महर्षी कर्वे यांच्या द्वितीय पत्नी) यांची बहीण.