नागपूरची ‘माग्रस’ चळवळ
11/12/2013
समाजातील वाचनवृत्ती कमी झाल्याची झळ नागपूरच्या ‘माग्रस’ चळवळीलादेखील लागली. ‘माग्रस’ (माझा ग्रंथ संग्रह) चळवळीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून अनेकांची खासगी ग्रंथालये वाङ्मयीन दृष्ट्या सशक्त केली. नागपूरच्या त्या उपक्रमासोबत जुळलेल्या कुटुंबांची आयुष्याची सायंकाळ सुरू झाली आहे. त्यामुळे नव्या पिढीने तो वसा पुढे चालवावा, यासाठी ती चळवळ ‘नेटिझन फ्रेंडली’ होऊ पाहत आहे. इंटरनेटवरून आवडीच्या विषयावर वाचन करणा-या युवक-युवतींना ‘माग्रस’ने त्या विषयांवर बोलण्यास साद घातली आहे. परंतु देव यांच्याशी त्याबाबत विचारणा केली असता, त्यांच्या आवाहनास कोमट प्रतिसाद मिळत असावा असे जाणवले.