अनंत हरि गद्रे
अनंत हरी गद्रे यांनी स्पृश्ये सवर्णांनी अस्पृश्यततेची रूढी पाडली; त्यामुळे त्यांनी प्रायश्चित्त घेऊन ती दूर करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे असे ठासून सांगितले व स्वतःला त्या कामासाठी वाहून घेतले. त्यांनी त्यासाठी झुणका-भाकर सहभोजन आणि स्पृश्याशस्पृश्यम सत्यनारायण ही दोन तंत्रे वापरली. ते दोन्ही उपक्रम 1941 मध्ये सुरू झाले. पंडित पानसेशास्त्री यांनी त्यावेळी पोथी सांगितली. समाजसुधारक र.धों. कर्वे त्यावेळी उपस्थित होते. त्या कामात त्यांना आचार्य अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, सेनापती बापट, शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी अशा मान्यवरांचा पाठिंबा व सहकार्य होते. समतानंदांनी सामाजिक क्षेत्रात सहासन, सहभोजन, सहपूजन, सहवसन आणि सहबंधन (आंतरजातीय विवाह) या पंचशीलाचा पुरस्कार केला. ते जेथे नोकरी करत, त्या मोदी बंधूंच्या चित्रपट कंपनीच्या मालकांनी त्यांना आर्थिक सहाय्य केले हे खरे, पण ते तेवढे पुरेसे नसे. तेव्हा गद्रे यांना पदरमोड करावी लागे. त्यांना त्यासाठी कर्जही काढावे लागे.