कुटुंब रंगलंय नेत्रदानात!

प्रतिनिधी 02/11/2011

विष्णू नगर, ठाणे. गणेशोत्सव स्टॉलमी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान  प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे वास्तव्य अणुशक्ती खात्यातील नोकरीनिमित्ताने (१९७१ ते १९९१) तेथे असताना १९८०च्या अखेरीस Reader's Digest मध्ये 'Sri Lanka gives eyes to the world' हा लेख मी वाचला आणि अचंबित झालो. हा इवलासा देश छत्तीस देशांना नेत्र पुरवतो हे वाचून फारच आश्चर्य वाटले. याला कारणीभूत होते डॉ. हडसन सिल्वां चे अथक प्रयत्न आणि त्यांना मिळालेली त्यांच्या पत्नीची साथ! भारतात नेत्ररोपणे होतात, त्यांतील अर्धेअधिक नेत्र हे श्री लंकेतू न येतात हे वृत्तपत्रांतून वाचून फारच लज्जास्पद वाटले.