‘सहित’चे संवत्सर नेमाड्यांच्या ‘नावे’
अठ्ठावीस वर्षांचा किशोर शिंदे त्याच्या वयाच्या मानाने विविध कार्याने संपन्न वाटतो; आणि विशेष म्हणजे त्याचे काम मराठी साहित्य संस्कृती यांच्या प्रसाराला वेगळे, नवे आणि आधुनिक वळण देण्याचे आहे! तो बोलतो शांत, मृदू. तो जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करतो, पण त्याला ओढ आहे मराठी साहित्याची . त्याने वयाच्या आठव्या वर्षापासून मराठी साहित्य वाचनास सुरुवात केली आणि सोळाव्या वर्षी ‘कोसला’ वाचली तेव्हा तो सर्दावून गेला! त्याला बोरकरांपासून ग्रेसपर्यंतचे कवी मुखोद्गत आहेत.