माझ्या आयुष्याचा अर्थ - दिनकर गांगल यांची मुलाखत
‘थिंक महाराष्ट्र’चे प्रवर्तक दिनकर गांगल एका वेगळ्याच तऱ्हेने 26 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजता प्रकटत आहेत. गांगल यांची प्रकट मुलाखत ‘चैत्रचाहूल’ उपक्रमाने त्यांच्या ‘गंभीर व गमतीदार’ मासिक सादरीकरण सत्रात योजली आहे. मुलाखत घेणार आहेत -‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार आणि ‘ऍड फिझ’चे विनोद पवार. स्थळ – रवींद्र नाट्यमंदिर, मिनी थिएटर
गांगल यांची वैचारिक झेप -
(दिनकर गांगल यांची साहित्यसंस्कृती क्षेत्रातील कारकीर्द मोठी, म्हणजे जवळजवळ पाच दशकांची आहे. त्यांनी ‘केसरी’, ‘सकाळ’ यांमध्ये पत्रकारिता केली. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ची रविवार पुरवणी वीस वर्षें, भालचंद्र वैद्य यांच्याबरोबर संपादित केली.)
• दिनकर गांगल यांनी सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना जुलै 1968 मध्ये केली.
• दिनकर गांगल यांनी अरुण साधू, कुमार केतकर, अशोक जैन अशा त्यांच्या चौदा मित्रांसह 1975 साली ‘ग्रंथाली’ला जन्मास घातले.
• दिनकर गांगल यांनी एकनाथ ठाकूर, कुमार केतकर, दिलीप महाजन, उषा मेहता वगैरेअशा त्यांच्या मित्रांबरोबर 1989 साली वाचन परिषद घेऊन वाचनाचा जाहीरनामा लिहिला.
• दिनकर गांगल यांनी 1995 च्या सुमारास जाहीरपणे लिहिले, की - ‘छापील शब्दाचा महिमा संपला’!