अथांग सागरात दिमाखात उभा… सिंधुदुर्ग किल्ला अनिश गांधी 04/06/2018

_AthnagSagrat_SindhudurgKilla_2.jpgशिवाजी महाराजांना शत्रूंची सागरी मार्गावरील आक्रमण परतावून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी सुरक्षित आणि भक्कम स्थळांचा शोध सुरू झाला. समुद्रकिनारे धुंडाळले गेले. त्या शोधाला पूर्णविराम मिळाला तो मालवणजवळील अरबी समुद्रातील कुरटे नावाच्या काळ्या खडकाळ बेटामुळे. ती जागा 1664 साली किल्ल्यासाठी निवडण्यात आली. किल्ल्याच्या बांधकामाला 25 नोव्हेंबर 1664 रोजी सुरुवात झाली व बांधकाम 1667 मध्ये पूर्ण झाले. ज्या चार कोळ्यांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी जागा शोधली त्यांना इनाम स्वरूपात गावे देण्यात आली.