भानगडवाडीचे झाले शिवाजीनगर!
गावाची ओळख ही तेथील लोकांच्या वागणुकीवरून बनते. उदाहरणार्थ शिस्तप्रिय, वक्तशीर पुणेकर, घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावणारे मुंबईकर! रोज भानगडी करणा-या आणि भांडणाऱ्या लोकांचे भानगडवाडी हे गाव. पण बचतगटाच्या माध्यमातून तेथील स्त्रियांनी भानगडवाडीचे फक्त नाव बदलले नाही तर त्यासोबत लोकांची मानसिकताही बदलली. गावाचा सामाजिक आणि आर्थिक विकाससुद्धा साधला! त्यामुळे पूर्वीची भानगडवाडी नावाचे गाव हे आता 'शिवाजीनगर' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. नकाशावर शिवाजीनगर अशी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा आहे तो तेथील स्त्रीशक्तीचा.