इगतपुरीतील दारणा धरण
23/06/2017
महाराष्ट्रात 1892 साली भीषण दुष्काळ पसरला होता. त्या दुष्काळात नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यानी महाराष्ट्राच्या नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा व त्यासाठीचे स्रोत यासंबंधी माहिती संकलित केली. त्या ओघात गोदावरी खोर्याचा अभ्यास होऊन दारणा नदीवर धरण बांधण्याचे ठरले.
नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवर नांदगाव बुद्रुक या गावाजवळ 1907 साली दारणा धरणाचे बांधकाम सुरू केले. धरण 1912 मध्ये पूर्ण झाले, तेव्हा धरणासाठी सुमारे 2738596 रूपये खर्च झाला होता. एच. एफ. बिलसाहेब हे सुपरिटेंडिंग इंजिनीयर त्या ‘स्पेशल ड्युटी’ हुद्यावर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधार्यांच्या कामांपैकी ते सर्वप्रथम केलेले काम. त्या पाणी साठ्याला बिल यांच्या नावावरून लेकबील असे नाव देण्यात आले.