शेतीतील कष्ट स्त्रियांचे, श्रेय लाटले मात्र पुरुषांनी!
‘शेतीची सुरुवात मानवी संस्कृतीत महिलांनी केली. पुरुष शिकारीसाठी बाहेर जात, त्या वेळी महिलांनी स्थानिक पर्यावरणातून बिया गोळा केल्या. त्या लावल्या आणि त्यांची वाढ करण्यास सुरुवात केली. त्यांनीच त्यामधून शेतीविज्ञान विकसित केले. जगभर शेतात काम करणाऱ्यांमध्ये महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे’... प्रसिद्ध शेतीतज्ज्ञ स्वामिनाथन यांनी ही मते ठामपणे व वेळोवेळी मांडली आहेत. शेतीची सुरुवात महिलांनी केली असे जगभरही मानले जाते.