रवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र

प्रतिनिधी 06/01/2016

रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बागेत झालेल्या जुलूम-जबरदस्तीविरुद्ध निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश राणीने बहाल केलेली उमरावकी परत केली. त्यावेळी त्यांनी ब्रिटिश राणीला उल्लेखून ३० मे १९१९ रोजी लिहिलेले पत्र. त्यामधून लोकभावनादेखील व्यक्त होते.

30 May 1919

Your Excellency,

पुरस्‍कार वापसीच्‍या पार्श्‍वभूमीवर


सप्रेम नमस्कार, वि.

लेखक-कलावंत-वैज्ञानिक मंडळींनी साहित्य अकादमीचे व अन्य सरकार पुरस्कृत पुरस्कार परत केले. त्या संबंधात काही व्यक्तींनी छोटीमोठी निवेदने प्रसिद्धीस दिली. त्यामध्ये एक मुद्दा तात्कालिक राजकीय निषेधाचा आहे व दुसरा लेखक-कलावंतांच्या आविष्कार स्वातंत्र्याचा. यासंबंधात सखोल विचार आवश्यक आहे असे मत सर्वत्र आढळून येते. त्यासाठी संदर्भ म्हणून अशा महत्त्वाच्या तीन घटना इतिहासकालात घडल्या व त्यावेळी संबंधित व्यक्तींनी निषेधात्मक कृती केली, त्यांची तीन निवेदने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केली आहेत – रवींद्रनाथ टागोर, ज्याँ पॉल सार्त्र व मालती बेडेकर. तुमच्या माहितीसाठी ती सोबत जोडली आहेत. ती निवेदने लेखक-समीक्षक दीपक घारे यांच्याकडून उपलब्ध झाली.

निषेधाचा असा भाग नोंदत जाण्याबरोबरच, ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ला महत्त्वाचा भाग वाटतो तो विधायकतेचा, रचनेचा. तसा मजकूर, रोज एक लेख याप्रमाणे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केला जातो. ते लेखन व्यक्तीची कर्तबगारी, संस्थेचे कार्य व संस्कृतिसंचित या तीन विभागांत अनेक पोटशीर्षकांतर्गत वाचायला मिळते. त्याखेरीज सांस्कृतिक जगातील वादचर्चेस पूरक अशा स्वरूपाचे लेखन-संकलनदेखील सादर केले जाते. तीन लेखकांची निवेदने हा त्यातील प्रकार.