सुजाता रायकर यांची रक्तापलीकडील साथ
सुजाता चेतन रायकर या ‘थॅलेसिमिया’ या रक्ताच्या गंभीर आजाराविषयी जनजागृती करतात आणि तो आजार झालेल्या निवडक मुलांचे पालकत्व घेऊन त्यांना सर्वतोपरी ‘साथ’ देण्याचे काम करतात.
सुजाता यांना त्यांनी मुंबईतील परळच्या ‘नाना पालकर आरोग्यकेंद्रा’त थॅलेसिमिया आजाराने बाधित काजलला आणि तिच्या आईला मदतीचा हात दिला तो क्षण आठवतो. तेव्हापासून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यांना ‘थॅलेसिमिया’ या आजाराची माहिती तेथे पहिल्यांदा कळली. त्यांनी त्या आजाराची भीषणता ध्यानी घेऊन तत्क्षणी दोन संकल्प सोडले - त्या आजाराविषयी जनजागृती करणे व त्याचा प्रतिबंध करणे आणि थॅलेसिमियाग्रस्त मुलांना मदतीचा हात देणे.