डॉ. पद्मजा घोरपडे - आनंदमग्न साहित्ययात्री
- नेहा काळे
पुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणा-या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणा-या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल. घोरपडे यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांचे हिंदी साहित्यावरचं, साहित्यकारांवरचं प्रेम. त्या हिंदी साहित्यीक, सूफी संत आणि त्यांचं साहित्य याबद्दल इतकं भरभरून बोलतात, की महत्प्रयासानं त्यांच्या स्वत:च्या कामाकडे गाडी वळवावी लागते. या सर्व साहित्यकारांचं ऋण त्या मनोभावे मानतात आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात प्रांजलता दिसून येते.
- नेहा काळे
पुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणार्या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणार्या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल.