Home Tags National Legal Services Authority

Tag: National Legal Services Authority

हिजड्यांच्या टाळीला समाजाची हाळी! (Transgender Community and Social Reaction)

मुलं पहिली-दुसरीच्या वर्गात अक्षरओळख शिकत असताना ‘छ’ अक्षर आलं की दोन शब्द हमखास सांगतात ‘छत्री’ आणि ‘छक्का’. छक्का म्हणत असताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या चोरट्या हसण्यात त्यांचा ‘छक्का’ या शब्दाबद्दलचा, तो शब्द धारण करणाऱ्या व्यक्तींबद्दलचा भाव लपलेला असतो. तो असतो उत्सुकतेचा, थोडा चेष्टेचाही. वस्तीत पैसे मागत फिरणारे छक्के किंवा हिजडे त्यांना आठवत असतात. घरातली मोठी माणसं त्यांच्याबद्दल काय बोलतात, त्यांच्याशी कशी वागतात हेही त्यांना आठवत असतं… मुलं मोठी झाली तरी त्यांच्या हिजड्यांबद्दलच्या भावना त्याच राहतात...