Tag: Ahmadnagar
माझी संस्था- आबासाहेब काकडे शिक्षण समूह, शेवगाव
शेवगावच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री आबासाहेब काकडे यांनी आणली. त्यांना विद्येचे, शिक्षणाचे महत्त्व माहीत होते. त्यांचे राहणे खेड्यातील पण दृष्टी आधुनिक जगाची होती. त्यांनी ‘माझी संस्था’ ची स्थापना 6 मार्च 1953 रोजी केली आणि तिचे जाळे सारा तालुका आणि जिल्ह्यात काही भागात विणले. साठ वर्षांत शिक्षणाच्या त्या बीजाचा वटवृक्ष झाला आहे. ती संस्था आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह म्हणून ओळखली जाते...
नागलवाडीचा काशी केदारेश्वर
शेवगाव तालुक्याहच्या नागलवाडी या गावचे काशी केदारेश्वर हे महादेवाचे मंदिर ऋषी काशिनाथबाबा यांच्या वास्तव्याने पावन मानले जाते. ते ठिकाण निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. चहुबाजूंनी डोंगर व मध्ये दरी; झाडे-वेली यांनी वेढलेला परिसर मन मोहून टाकतो ! मंदिरही सुबक आहे. जवळच पाण्याचे तळे आहे...
प्रशासनातील पुरुषोत्तम – पुरुषोत्तम भापकर
पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...
शेतकऱ्यांचे स्वप्न जगणारा युवा कृषीसंशोधक – आदिनाथ काटे
आजच्या परिस्थितीत, मला शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित विषयात कारकीर्द करायची आहे असे कोणी म्हणाले तर त्याला समाज सोडाच त्याच्या घरातील लोकसुद्धा वेडा ठरवतील ! पण जिरायत आणि दुष्काळी अशी ओळख असणाऱ्या शेवगाव तालुक्यातील आखेगाव या छोट्याशा गावातील आदिनाथ एकनाथ काटे या युवकाने मात्र तेच स्वप्न पाहिले...
बालंबिका देवीचे बालमटाकळी
बालमटाकळी हे अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या पूर्व टोकाला वसलेले जुने गाव. त्या गावाला पूर्वी टाकळी किंवा बोधेगाव-टाकळी असे म्हटले जात असे. त्या शेजारीच बोधेगाव आहे. त्या गावाचे हे जोडगाव गणले जाई. गावाचे ग्रामदैवत बालंबिका देवी. तिच्या नावावरून त्या गावाला बालमटाकळी म्हणू लागले...
तेजस्वी सातपुते – अंधारातून आयपीएसच्या तेजाकडे (Young IPS Tejasvi Satpute)
शेवगाव तालुक्यातून थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणारी तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही पहिली व्यक्ती ! ती पुणे येथे गुप्तचर विभागात आयपीएसपदी कार्यरत आहे. तिने तिच्या कारकिर्दीत तडकाफडकी अनेकदा करियरच्या वाटा बदलल्या व हव्या त्या क्षेत्रात यश मिळवले. त्याचीच ही कहाणी...
शेवगावचा एव्हरेस्टवीर अविनाश बावणे (Avinash Bavane from Shevgaon… to Everest)
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील तरुण अविनाश बावणे याने नौदलाच्या पथकाबरोबर जाऊन एवरेस्ट शिखर सर केले. त्याने तो पराक्रम तीन दिवसांत दोनदा केला- प्रथम एकट्याने व नंतर पुन्हा चमूबरोबर समूहाने. अशी यशसिद्धी असलेला जगातील तो एकटाच...
शेवगावच्या साहित्य चळवळीचा मानबिंदू – महात्मा सार्वजनिक वाचनालय
न्या. महादेव गोविंद रानडे यांनी 1885 साली स्थापन केलेले महात्मा सार्वजनिक वाचनालय हे शेवगावच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीचा मानबिंदू ठरले आहे. बाळासाहेब भारदे यांनी वाचनालयाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना त्यास वैभव प्राप्त करून दिले. वाचनालयात पन्नास हजारांहून अधिक ग्रंथ तर तीस दैनिके, सोळा साप्ताहिके, सहा पाक्षिके आणि वीस मासिके अशी संपदा आहे...
जातिभेदाला सरकारी उत्तेजन ! (Government Promotes Casteism Indirectly)
ज्या लोकांना जातीनिहाय आरक्षण नको आहे, त्यांना त्यांची जात ‘माणूस’ अशी लिहिता आली पाहिजे. ज्यांना हिंदू धर्म ठेवायचा आहे, पण जातिभेद पाळायचा नाही, त्यांना आवश्यक असेल तेथे धर्म ‘हिंदू’ आणि जात ‘माणूस’ अशी नोंद करता आली पाहिजे. जातिभेद नाहीसे किंवा निदान कमी करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल असेल…
वावटळ : ग्रामीण दुःखाचे वास्तव चित्रण (Vavtal – Representative Poetry collection of rural life)
‘वावटळ’ हा प्राध्यापक द.के. गंधारे यांचा पहिला काव्यसंग्रह कवितेच्या दालनात आत्मविश्वासाने प्रवेश करतो. ‘वावटळ’मधील कविता ग्रामीण वास्तवाला साक्षात करते. काटेवनाची मोठी अरण्ये जागतिकीकरणानंतर झाली आहेत. त्यांतील अडचणींच्या वावटळींनी अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. तीच वावटळ गंधारे यांच्या कवितेतून साकार झाली आहे. कवी बालपणापासून ग्रामीण जीवनाशी एकरूप झालेला आहे. त्यामुळे त्याच्या अनुभवांनी त्याच्या कवितांत प्रातिनिधिक रूप धारण केले आहे...