Home Tags वऱ्हाडी भाषा

Tag: वऱ्हाडी भाषा

परंपरा जपणारे शिंदी बुद्रुक

चक्रधर स्वामी यांचे वास्तव्य लाभलेले, ग्रामदेवता मरिआईची मिरवणूक, 'द्वारकाच्या बैला'ची मिरवणूक, श्रावणात घरोघरी केल्या जाणाऱ्या 'माळी पौर्णिमे'ची पूजा अशा अनेक आगळ्यावेगळ्या प्रथा, परंपरा, उत्सव जोपासणारे, एकेकाळी अजरामर संगीत नाट्यकलावंत घडवून ‘नाटकांची शिंदी’ म्हणून ओळख निर्माण केलेले, 'शिक्षकांचे गाव' अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील गाव म्हणजे ‘शिंदी बुद्रुक’...

वऱ्हाडची राजधानी अचलपूर

अचलपूर ही वऱ्हाडची जुनी राजधानी. त्या परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. एलिचपूर हे त्याचे जुने नाव. त्या गावाला लष्करी डावपेचाच्या दृष्टीने इतिहासात फार महत्त्व होते. भारताच्या उत्तरेतून दक्षिण प्रदेशात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वारच ते ! बराणीने अचलपूरचा भारताच्या दक्षिणेकडील एक महत्त्वाचे शहर म्हणून तेराव्या शतकात उल्लेख केलेला आहे...

बहिरमचं झगमग स्वप्न

ऋणमोचन आणि बहिरम या जत्रा वऱ्हाडीतील प्रसिद्ध म्हणाव्या अशा आहेत. लेखक मधुकर केचे यांनी बहिरमच्या यात्रेचे वेधक असे चित्रण त्यांच्या लेखनातून केले आहे. त्यांनी या जत्रेचे वर्णन सातपुड्याच्या पायथ्याशी महिनाभर मुक्कामाला येणारे एक झगमग स्वप्न असे केले आहे...

अचलपूरचा समाजसुधारक कलावंत – राजा धर्माधिकारी

अचलपूरच्या सांस्कृतिक विश्वातील हरहुन्नरी हास्य कवी, कलाकार राजा धर्माधिकारी म्हणजे दिलखुलास गप्पांचा धबधबाच ! नर्म विनोदी कोट्या करून वातावरण हलकेफुलके करण्याची त्यांची लकब मनाला भावते. ते हातचे काही न राखता भरभरून बोलत असतात, तो वऱ्हाडी संभाषणाचा नमुनाच ठरून जातो...