Home Tags लोकसंस्कृती

Tag: लोकसंस्कृती

जगाला प्रेम अर्पावे ! (Offer love to the World)

समाजात सगळीकडे अस्वस्थता पसरलेली असताना, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काय करायला हवे? संवेदनशीलतेने विचार करणाऱ्या माणसांच्या मनात असा प्रश्न असंख्य वेळा उद्भवतो. त्याचे समी‍करणातून देण्यासारखे उत्तर नाही. समाजाच्या परीघामध्ये ज्ञान, धर्म, राजकारण, लैंगिकता, स्त्री-वाद, पुरुषप्रधानता अशा क्षेत्रांतील विचारांचे सत्य समजून घेण्यासाठी, संकुचित विचार आणि वर्तन याबाबत सजगता येण्यासाठी सर्वांनी कार्यरत झाले पाहिजे...

आरोग्य भानची गोष्ट (The Story of Awareness of Health)

6
आरोग्य म्हणजे शरीर तर आहेच; पण अन्न, पाणी, मानवी मन, भवताल, भावभावना, नातेसंबंध या विशाल परीघामध्ये येणाऱ्या असंख्य गोष्टी या आरोग्य राखण्यासाठी असतात. या परिस्थितीबाबत काय करता येईल याविषयी संवाद घडवणे आणि त्यातून माणसांनी सक्षम होणे शक्य आहे असा विचार करून निर्माण केलेली संस्था म्हणजे ‘आभा’- आरोग्य भान ! लोकांच्या शारीरिक आणि मानसिक आयुष्यात बदल घडवण्याची क्षमता डॉ. मोहन देस यांच्या संस्थेच्या कामात आहे...

दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य

‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
_Bharud_1_0.jpg

भारूड (Bharud)

भारूड या लोककलेचे ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल आकर्षण आहे. भारूडाचे आयोजन स्वतंत्रपणे वार्षिक ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा आणि तशा इतर उत्सवांमध्ये केले जाते. त्या कलेत लोकमानस जिंकण्याची ताकद आहे, तेवढी ती रंगतदारही आहे. प्रबोधन हा त्या कलेचा गाभा आहे. भारूड नाट्य, वक्तृत्व आणि संगीत यांच्या मिलाफातून रंगत जाते. ते अध्यात्माच्या प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या कलाप्रकाराचे जनक मानले जातात...