Home Tags महानुभाव पंथ

Tag: महानुभाव पंथ

रुक्मिणी स्वयंवर (Rukmini Swayamvar)

1
मध्ययुगीन मराठी साहित्यात रुक्मिणीच्या स्वयंवराची कथा वारंवार लिहिली गेली. आद्य मराठी कवयित्री महदाइसा उर्फ महदंबा हिने ‘मातकी रुक्मिणी स्वयंवर’ हे आख्यानकाव्य लिहिले आहे. रामदेवराय यादवाने त्याच्या पदरी असलेल्या कवी नरेन्द्राकडे, त्याने लिहिलेले ‘रुक्मिणी स्वयंवर’ त्याच्या नावावर करावे म्हणून आग्रह धरला मात्र नरेन्द्र व-हाड प्रांतात निघून गेला अशी आख्यायिका आहे. नंतरच्या काळात लिहिलेले आणि आजही लोकप्रिय असलेले रुक्मिणी स्वयंवर म्हणजे संत एकनाथांचे ‘रुक्मिणी स्वयंवर’...

नागलवाडीचे नागार्जुन – पुराणे शास्त्रज्ञ

0
नगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील नागलवाडी हे मराठवाड्याच्या सीमेलगत वसले आहे. म्हणून त्याला तालुक्यातील शेवटचे गाव असे म्हणतात. नागलवाडी गाव छोटे असले तरी त्याची महती थोर आहे. गावाला पौराणिक व ऐतिहासिक असे दोन्ही संदर्भ लाभले आहेत. तेथे केदारेश्वरचे जुने मंदिर आहे. तेथून जवळ असलेल्या गुहेत प्राचीन रसायनशास्त्रज्ञ नागार्जुन यांची प्रयोगशाळा व वास्तव्य होते असे सांगितले जाते...

महानुभाव पंथीयांचे पूजनीय अचलपूर

अचलपूर तालुका हा महानुभाव पंथीयांसाठी श्रद्धास्थान आहे. त्यांच्या पवित्र जागा तालुक्यात अनेक आहेत- अष्टमहासिद्धी, वडनेर भुजंग, असदपूर, काकडा, अचलपूर शहरातील रत्नपूजा, निर्वाणेश्वर, बोरबन, पिंगळभैरव, लाखबन, देव्हार चौकी, अंबीनाथ, सोमनाथ ही ती श्रद्धास्थाने. महानुभावांना स्थान म्हणजे परमेश्वर अवताराच्या स्पर्श सबंधाने पवित्र झालेले ठिकाण. एकूण अकरा प्रकार स्थानासबंधी आहेत...

फलटणचे जब्रेश्वर मंदिर

फलटणला महानुभाव पंथीयांची ‘दक्षिणकाशी’ म्हणून ओळखले जात असे. तेथे महानुभाव पंथियांची अनेक मंदिरे आहेत. महानुभाव साहित्यात फलटणचा उल्लेख ‘पालेठाण’ म्हणून केलेला आढळतो. फलटणचे ‘जब्रेश्वर मंदिर’ आजही राजवाडा व श्रीराम मंदिर यांच्या जवळ रस्त्याच्या मधोमध उभे आहे...

अचलपूर येथील महानुभाव पंथाचे पाचवे अवतार श्री चक्रधरस्वामी

महानुभाव पंथातील पाचवे अवतार श्री चक्रधर स्वामी अचलपूर येथे दहा महिने वास्तव्य करून होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंत रत्नपूजा मंदिर, अंबिनाथ मंदिर, अष्टमहासिद्धी मंदिर यांचा समावेश होतो...

अचलपूर नगरी- ऐतिहासिक वास्तू

अचलपूर म्हणजे पौराणिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली आणि एकेकाळी विदर्भाची म्हणजेच वऱ्हाडची राजधानी हे बिरुद मिळवणारी नगरी ! त्यामुळे त्या नगरीत विविध वंशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या काळात अनेक वास्तू बांधल्या. त्या शिल्प-स्थापत्यांमध्ये मंदिर स्थापत्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा अशी काही मंदिरे आहेत. त्यामध्ये केशव नारायण मंदिर, कार्तिकेय मंदिर, देवी मंदिर यांचा उल्लेख करता येईल...

पळण (Running away from Village)

मी आईला विचारले, “आय, का आलो आपण इथं?” आईने थोडक्यात उत्तर दिले, “याला पळण म्हणतात.” मी प्रश्न विचारला, “पळण म्हणजे काय?” माझी आई मला माझ्या नावावरून लहानपणी देवके म्हणत असे. ती मला म्हणाली, “अगं देवके, आज आपल्या गावात हिंदू लोकं नवरात्रीच्या टायमाला देवीला बळी देतात. म्हणून आपण इथं आलो.”...
nav-nashik-navhe-nasik

नाव नाशिक; नव्हे, ‘नासिक’

1
‘नासिक शहर’ हे प्राचीन असे नाव आहे. सध्या सगळे लोक ‘नासिक’ या शहराच्या नावाचा उल्लेख हा ‘नाशिक’ असा करतात. परंतु त्या शहराचे मूळ नाव...
-nathsanpraday

नाथसंप्रदाय : उदय आणि विस्तार

नाथसंप्रदाय हा संप्रदाय स्वरूपात केव्हापासून प्रचलित झाला हे सांगणे अवघड आहे. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांचा काळ हा नाथसंप्रदायाच्या प्रवर्तनाचा काळ मानला जातो. नाथसंप्रदाय हा...

देवगिरीचे यादव साम्राज्य

यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. कल्याणीचे चालुक्य व चोल यांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ते घडून आले. यादववंशीय राज्यकर्ते त्यांना स्वत:ला श्रीकृष्णाचे वंशज...