Home Tags बाळासाहेब यावलकर

Tag: बाळासाहेब यावलकर

विदर्भ मिल्सचे सांस्कृतिक वैभव हरवले ! (Rich Family of Vidarbh Mills Staff & Workers)

अचलपूरची विदर्भ मिल केव्हाच बंद पडली. तेथे आणलेली ‘फिनले मिल्स’ही टिकू शकली नाही. परंतु ‘विदर्भ मिल्स’चे कामगार व कर्मचारी यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने बांधलेल्या वसाहतीतील सांस्कृतिक जीवन हा कित्येक दशकांसाठी तेथील रहिवाशांकरता ठेवा होऊन राहिला आहे. त्या कामगार-कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवापासून क्रिडास्पर्धेपर्यंत अनेकानेक ‘इव्हेण्टस’ होत. त्या प्रत्येक घटनेमधून मुलामाणसांसाठी नवा संस्कार प्रस्थापित होई. तेच तर त्या रहिवाशांचे ‘धन’ होते. त्यामुळे मिल चालू असणे वा बंद असणे याचा परिणाम त्यांच्या जीवनावर क्वचितच जाणवला असेल...

विदर्भ मिल्स – अचलपूरचे गतवैभव (How Vidarbh Mill lost its existence)

अचलपूरची ‘विदर्भ मिल्स’ ही जुन्या कापड गिरण्यांपैकी एक. अन्य दोन गिरण्या सोलापूर व अंमळनेर येथे होत्या. विदर्भ मिल त्या प्रदेशातील कापसाचे पिक ध्यानी घेऊन बाबासाहेब देशमुख यांनी सुरू केली आणि ती एका वैभवाला पोचलीदेखील. पण सरकारी हस्तक्षेपामुळे तिची पडझड झाली, तेथे ‘फिनले मिल्स’ सुरू करण्यात आली. तीही बंद पडली आहे... विदर्भ मिलची दु:खद कहाणी !...