Home Tags पुस्तक परिचय

Tag: पुस्तक परिचय

वृत्त माध्यमाचा रुतबा ! – ऑन द फील्ड

प्रगती बाणखेले यांचे ‘ऑन द फील्ड’ हे पुस्तक ‘वास्तवाच्या जमिनीवर ठाम उभे आहे आणि ते मनात खोलवर उतरत जाते. वाचक पुस्तकाच्या सोबतीने वाहत राहणे ही अपरिहार्यता सहजपणे स्वीकारतो. ऑन द फील्ड’ या पुस्तकाने मोठा अवकाश व्यापला आहे, इतका की एकेका प्रकरणाचे स्वतंत्र पुस्तक व्हावे...

अश्व परीक्षा, नव्हे अश्व पुराण !

0
भारतीय लोकांना अठरा पुराणे ठाऊक आहेत. त्या अठरांत कूर्म आणि वराह या नावांची प्राण्यांना उद्देशून दोन पुराणे आहेत. ते विष्णूचे अवतार. मात्र घोडा हा माणसाचा जुन्यातील पाळीव प्राणी आणि त्याचे महत्त्व असूनदेखील त्याच्या नावाने एखादे पुराण नाही कारण विष्णूने अश्वावतार घेतला नव्हता ! मात्र अश्वपरीक्षा नावाचे एक जुने पुस्तक वाचण्यास मिळाले आणि पुराणाची उणीव भरून निघाली. घोड्याला संस्कृतीत यथायोग्य स्थान मिळाले अशी भावना झाली. त्या ‘अश्वपुराणा’ची ओळख करून घेण्यापूर्वी त्या ग्रंथाच्या संग्राहकाची ओळख करून घेण्यास हवी. पुस्तक संकलित केले आहे रामचंद्र सखाराम गुप्ते यांनी...

उमर खय्यामची फिर्याद

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास

जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...

खेळ मांडीयेला : भातुकलीचा इतिहास (Bhatukli – Enjoyable home management game for girls)

वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या पुस्तकातून भातुकली या खेळाचा, मराठी संस्कृतीचा व समृद्ध परंपरेचा इतिहास आणि वारसा प्रकट होतो ! भातुकलीच्या सर्व पैलूंचे दर्शन आणि दस्तावेजीकरण या पुस्तकात आढळते…

भानू काळे यांचे ललित चिंतन : गंध अंतरीचा (Bhanu Kale’s new book expresses his...

निबंधात जसा नुसता निबंध, लघुनिबंध, ललित निबंध असा प्रवास झाला आहे, त्याप्रमाणे ‘गंध अंतरीचा’ हे आहे भानू काळे यांचे ललित चिंतन. काळे हे मराठीतील आघाडीचे लेखक...

स्टीफन्स यांचे ‘ख्रिस्त पुराण’ – प्रतिभेचे अद्भुत लेणे (Christ Puran: Stephens Great Marathi Literary...

‘ख्रिस्त पुराण’ महाकाव्याचे कवी फादर थॉमस स्टीफन्स हे मूळचे इंग्लंडमधील. ते वयाच्या तिसाव्या वर्षी रोम व लिस्बन मार्गे 24 ऑक्टोबर 1579 रोजी गोव्यात आले. थॉमस स्टीफन्स यांचे नाव मराठी वाङ्मयात प्रामुख्याने घेतले जाते ते त्यांच्या ‘क्रिस्त पुराण’ महाकाव्याबद्दल.