Home Tags नेत्रदान

Tag: नेत्रदान

अंधांना डोळे आणि डोळसांना दृष्टी – अत्याळची चळवळ

‘नेत्रदान’ हे श्रेष्ठ दान आहे ही जाणीव गडहिंग्लज तालुक्याच्या ‘अत्याळ’ गावातील लोकांमध्ये जागी झाली आहे. तेथे गेल्या दहा वर्षांपासून (2012) ‘अंधांना डोळे व डोळसांना दृष्टी’ या ब्रीदवाक्यावर आधारित चळवळ सुरू आहे. कौतुक म्हणजे अत्याळमधील चळवळीशी वर्षागणिक नवी गावे जोडली जात आहेत. चळवळीच्या माध्यमातून त्या छोट्या छोट्या गावांतून अकरा वर्षांत शहाण्णव जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे ! परस्परांपासून दुरावत चाललेली माणसे एकमेकांना जोडली जावीत ही भावना हा चळवळीचा गाभा होऊन गेला आहे. ज्या अंधांना नेत्र प्रत्यारोपणातून दृष्टी मिळू शकत नाही अशा दृष्टीहीनांचा समाजातील वावर सुकर व्हावा म्हणून कार्यशाळा आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती केंद्र असे जादा उपक्रमही चळवळीमार्फत चालतात...

सिनेमातील (सुमित्रा) भावे-प्रयोग

1
सुमित्रा भावे यांचा सिनेमा पहिल्यांदा पाहताना तो जितका आकळतो, भावतो आणि आवडतो त्याहून तो सिनेमा दुसऱ्यांदा पाहताना होणारे आकलन अधिक खोल असते. सुमित्रा भावे यांच्या बरोबर सुनील सुकथनकर हे दिग्दर्शक म्हणून असतच. त्या जोडीने पूर्ण लांबीचे सतरा सिनेमे, लघुपट सत्तरच्या आसपास आणि दूरदर्शन मालिका पाच दिग्दर्शित केल्या आहेत...
_Chandrabhaga_Gurav_1.jpg

बीडच्या प्रकाशयात्री चंद्रभागा गुरव

बीडच्या चंद्रभागा गुरव यांनी नेत्रदानाबाबत मोठी जनजागृती करून गेल्या सहा वर्षांत तीनशेचाळीस डोळ्यांचे संकलन केले आहे. जन्मजात वा अपघाताने आलेल्या अंधत्वामुळे आयुष्यभर डोळ्यांसमोर अंधार घेऊन...
_Swapnil_Gawande_1.jpg

स्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा

स्वप्नील गावंडे हा अमरावती जिल्ह्यातील तरुण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून नेत्रदानासंबंधी जनजागृतीच्या कामाला लागला आहे. त्याने ‘दिशा ग्रूप’च्या माध्यमातून दहा वर्षांत दहा लाख लोकांपर्यंत...
netradaan1

कुटुंब रंगलंय नेत्रदानात!

मी वैयक्तिक पातळीवर १९८१च्या सुरुवातीस कल्पाक्कम, तमिळनाडू येथे नेत्रदान  प्रचार-प्रसार कार्यास सुरुवात केली. आमच्या घरात कोणाला अंधत्व आले किंवा अंधत्व घेऊनच कोणी जन्माला आले म्हणून नाही. माझे वास्तव्य...

जप्तीवाले!

वंचितांचा विचार करून त्यांच्या विकासासाठी झटणारी माणसे समाजात आहेत. अशा व्यक्ती स्वत:च्या पलीकडे विचार करतात, आचरण करतात. अशाच एका जोडप्याला मी भेटलो. या दांपत्‍याचे...

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...