Home Tags डोंबिवली

Tag: डोंबिवली

दापोलीच्या रेखा बागूल – कर्णबधिरांना आसरा ! (Rekha Bagul works mainly for deaf children...

0
रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे...

घरकुल – समाजाच्या स्वायत्ततेचे लक्षण (Gharkul – An Autonomous Community !)

भारतात विशेषत: महाराष्ट्रात एक माणूस – एक संस्था अशी घट्ट परंपरा आहे; त्याच वेळी, संस्थाजीवन हे त्या त्या संस्थांमध्ये गुंतलेल्या ध्येयप्रवृत्त माणसांच्या पलीकडे बहरले पाहिजे असेही समाजाला वाटत असते, ‘काडी काडी वेचताना...’ हे अविनाश बर्वे यांचे पुस्तक वाचत असताना या दोन्ही समजुतींचा प्रत्यय येतो आणि विचाराला टोक येऊ शकते. डोंबिवलीजवळच्या खोणी येथील ‘घरकुल’ या त्यांच्या संस्थेची कहाणी ‘काडी काडी वेचताना...’ या पुस्तकात आहे...

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे...

नाशिकचे योग विद्या धाम

बाळासाहेब लावगनकर यांनी ‘योग विद्या धाम’ या संस्थेची स्थापना जगभर योगशास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने 1960 साली केली. सध्या योगाचार्य विश्वास मंडलिक हे योगशास्त्राचा प्रचार करत आहेत. संस्थेचे मुख्य केंद्र नाशिक येथे आहे. तेथे योग विद्यापीठ व ‘विश्वयोग दर्शन’ हा योग आश्रम बांधला आहे. त्या ठिकाणी गुरुकुल पद्धतीने योगाचे निवासी वर्ग चालतात...
sbi

धर्मविधींसाठी ‘ज्ञानप्रबोधिनी’ पौरोहित्य व्यवस्था

पुणे येथील ‘ज्ञानप्रबोधिनी’ संस्थेची स्थापना कै. विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे यांनी 1962 साली केली. प्रबोधिनी ही मुख्यतः गुणवंत विद्यार्थ्यांची शाळा म्हणून परिचित आहे....
_BhauSathe_Shilpalay_4.jpg

भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय

0
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
_Dombivali_Ganesh-Mandir_.jpg

श्रीगणेश मंदिर संस्‍थान – जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक!

डोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य! भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी...
_Rupak_Pawar_1.png

तबला वादक रुपक पवार

रूपक पवार ह्यांना ‘तबला रूपक’ ह्या नावाने कोणी हाक जरी मारली तरी चालेल असे तेच हसत हसत पण नम्रपणे सांगतात. इतके ते तबला या...
carasole

सचिन केळकर – डिजिटल द्रष्टा

सचिन केळकरने वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी आयटी क्षेत्रातील मोठ्या हुद्द्याची आणि पगाराची नोकरी सोडली आणि तो डिजिटल मीडियात उतरला. त्याला त्या व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्याने...

नव्या प्रबोधनाचे साक्षीदार (Witness the New Enlightenment)

0
डोंबिवली ग्रंथ संग्रहालय गेल्या काही वर्षांत पुन्हा चैतन्यमय झाले; तेथे अनेक उपक्रम होऊ लागले, वाचकांची वर्दळ वाढली. सुधीर बडे यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ नागरिकांनी...