Home Tags डेबू जानोरकर

Tag: डेबू जानोरकर

गाडगेबाबांची मंतरलेली पत्रे – सार्वजनिक त्यागाची गीता (Gadgebaba’s letters are treasure of India’s value...

1926 ते 1956 असा साधारणपणे तीस वर्षांचा पत्रप्रपंच, म्हणजे ‘सार्वजनिक त्यागाची गीता’ आहे असेच म्हणावे लागेल. बाबांच्या पत्रांतून त्यांच्या कार्याबरोबर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होते. त्यांच्या पत्रसंग्रहात त्यांचा संपूर्ण आयुष्यक्रम गोवलेला आहे. ते जितके त्यागी-तितकेच संसारी, जितके ममताळू- तितकेच कठोर, जितके विरक्त-तितकेच संग्राहक, व्यावहारिक व प्रापंचिक वृत्तीने जितके सरळ- तितकेच कोणाबरोबर कोठे नि काय नि किती बोलावे याचे तारतम्य त्यांच्याजवळ होते. त्यांच्या पत्रांतून वाचकासमोर स्वच्छता, व्यवहारकुशलता, गुणग्राहकता, धार्मिक वृत्ती, कृतज्ञता, निराग्रही स्वभाव, तळमळ असा विविधांगी ‘इंद्रधनू’ उभा होतो...

गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)

गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...

डेबूची साधना

0
डेबू जानोरकर ते गाडगे महाराज हा या माणसाचा प्रवास न्याहाळला तरी थक्क व्हायला होते. त्यात डेबू जानोरकरची कथा वेगळी, पण तेवढीच अद्भुत व थक्क करणारी वाटते...
_Gadgebabnchya_Paulkhuna_1.jpg

गाडगेबाबांच्या… बालपणीच्या पाऊलखुणा शोधताना

अमरावती जिल्ह्यातील ‘शेंडगाव’ हे गाडगेबाबांचे जन्मगाव. गाडगेबाबांनी बालवयातील 1876  ते 1884 पर्यंतचा काळ तेथे व्यतीत केला. अमरावती ते शेंडगाव हे अंतर सत्तर किलोमीटरचे. डेबूच्या पाऊलखुणा इतरत्र दिसतात का ते शोधण्यासाठी गावात निघालो असता बाहेर एक तरूण भेटला. तो जानोरकर परिवारातील होता. त्याला गाडगेबाबांविषयी माहिती त्रोटक होती. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेती करतो. ज्या गाडगेबाबांनी त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या प्रचार-प्रसारासाठी खर्ची घातले त्या दस्तुरखुद्द गाडगेबाबांच्या गावात आणि परिवारात शिक्षणाबद्दल ही अनास्था...
carasole

गाडगेबाबांची कीर्तनाभाषा

0
गाडगेबाबांची कीर्तनभाषा ही जनभाषा आहे. संवाद हा त्या भाषेचा गाभा. ते एकेका शब्दाचा प्रश्‍न लोकांना विचारत आणि लोकांचा होकार मिळवत. त्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे विषय स्वच्छता, जातिनिर्मूलन, अस्पृश्यतानिषेध, गरिबांना मदत, व्यसनमुक्ती, प्राणिमात्रदया, अन्न-वस्त्र-निवारा-विचार, शिक्षण, ज्ञान हे मुख्यतः आहेत. ते शिक्षणाला अग्रस्थान देतात...