Home Tags चिंतामणराव पटवर्धन

Tag: चिंतामणराव पटवर्धन

ऐसे उगार माझे गाव ! (Ugar – My town)

उगार खुर्द हे भूतपूर्व सांगली संस्थानातील छोटेसे खेडेगाव. गाव स्वतंत्र भारतात गेल्या पाऊणशे वर्षांत पूर्ण पालटून गेले आहे. मूलत: दक्षिणवाहिनी असणारी कृष्णा नदी उगारजवळ उत्तर वाहिनी होते. अशा वळणाला तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे नदीला प्रशस्त दगडी घाट वरपासून खाली, अगदी पात्राच्या मध्यभागापर्यंत आहे. शंभर वर्षे झाली तरी त्या घाटाचे बांधकाम अभंग आहे. उगार खुर्दला भाषिक सलगतेच्या तत्त्वावर सीमेलगतचे गाव म्हणून राज्य सरकारने भाषिक सवलती दिल्या आहेत...

मराठी आणि बंगाली रंगभूमी : आरंभीचा इतिहास

भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. चेतनानंद यांच्यासारख्या रामकृष्ण मिशनमधील मोठ्या व्यक्तीने गिरीशचंद्र यांचे चरित्र लिहिले, ते कुतूहलाने वाचले आणि बंगाली रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत गेला. बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीत काही साधर्म्य आढळली. स्त्रियांनी नाटकात काम करण्याला दोन्ही रंगभूमीवर तितकाच विरोध आणि उपहासात्मक टीका झाली...

मराठी संगीत रंगभूमी- मर्मबंधातील ठेव (Musicals on Marathi Stage – Rich Tradition)

1
मराठी संगीत रंगभूमी ही महाराष्ट्रीय मनाच्या मर्मबंधातील ठेव आहे. त्यामुळे पद्याला, संगीतकलेला रंगभूमीचे अधिष्ठान मिळाले आणि तो वेलू जो गगनावेरी गेला, तो अनेक वळणे घेत, चढउतार अनुभवत, आजतागायत लोकप्रियतेच्या किमान पातळीवर राहिला.