Home Tags कोळगाव

Tag: कोळगाव

शेवगावची वीस गावे पाण्यासाठी तहानलेली !

शेवगाव तालुक्यातील वीस गावांची पाणी योजना पंचवीस वर्षे झाली तरी प्रत्यक्षात आलेली नाही; मात्र वीस गावांसाठी पाणी आंदोलन झाले. जायकवाडी धरण बांधताना सरकारने शेवगाव तालुक्याकरता धरणातील 3.8 टी.एम.सी. पाणी राखून ठेवले जाईल असे आश्वासन दिले होते. त्यासाठी पंप ‘ताजनापूर’ या गावी बसवला जाणार होता, म्हणून त्या योजनेला ‘ताजनापूर लिफ्ट योजना’ हे नाव पडले. त्यासाठी आंदोलने, चळवळी, संघर्ष सुरू झाला आणि अद्यापही सुरूच आहे...
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

आठवणीतला खानदेशी पोळा

जळगावातल्‍या भडगाव तालुक्‍यातलं कोळगाव हे माझं गाव. लहानपणी गावात पाळली जाणारी बैलगाडं गावाबाहेर नेण्याची प्रथा मी पाहिली आहे. कित्येक वर्षांपासून चालू असलेली ही प्रथा गावातल्या एका वजनदार माणसाच्या सोयीसाठी अचानक मोडली गेली. पोळ्याला कोणी कोणता बैल धरायचा यावरून आम्हा भावंडांमध्ये भांडणं होत. सर्वांना आधी पळणार्‍या बैलाला धरायला आवडे. कोणी म्हातार्‍या बैलाला धरायला तयार नसे. कोण कोणता बैल धरणार हे ठरल्यावर जो तो आपापल्या बैलाकडे अधिक लक्ष देई. जो तो सालदारांनी कापून आणलेलं हिरवंगार लुसलुशीत गवत आपल्याच बैलांना अधिक टाके...