Home Tags कीर्तनकार

Tag: कीर्तनकार

आबासाहेब काकडे : प्रेरणा कोल्हापूरची (Abasaheb Kakade : Inspiration from social movements in Kolhapur)

‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...

गंधर्वतुल्य गायन करणारे नट – भाऊराव कोल्हटकर

मराठी रंगभूमीवरील गायक नट म्हणून भाऊराव कोल्हटकर हे त्यांच्या ‘शकुंतला’, ‘सुभद्रा’, ‘मंथरा’ या त्यांनी साकारलेल्या स्त्रीभूमिकांमुळे विशेष गाजले. परंतु पुढे, त्यांनी ‘सुभद्रे’चा अपवाद वगळता 1889 सालानंतर मुख्यत्वे पुरुष भूमिका साकारल्या त्या अखेरपर्यंत. भाऊराव त्यांचा मधुर गळा, त्यांचे सौंदर्य आणि त्यांचा उत्तम अभिनय यांमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोचले…

आधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य

0
पंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...

शोध गाडगेबाबांचा (Gadgebaba the social Reformer)

गाडगेबाबांचा उल्लेख संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, कर्मयोगी अशा अनेक प्रकारे केला जातो. मात्र तो माणूस अध्यात्माच्या नावाखाली पोपटपंची करणारा हभप नव्हता. त्यांचे कीर्तन माणसांच्या मन आणि मेंदू यांना प्रथा, परंपरा, कर्मकांड यांचे जे झापड लागले आहे, ते दूर करणारे होते...

कीर्तनाचे महानिर्वाण

मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...