Home Tags अक्कलकोट

Tag: अक्कलकोट

संत गजानन महाराज – शेगावीचा राणा (Saint Gajanan Maharaj of Shegaon)

0
शेगावचे मूळ नाव शिवगाव. ते शिवगाव असे तेथील प्रसिद्ध शिवमंदिरामुळे प्रथम पडले. त्या शिवगावचे झाले शेगाव. शृंग ऋषींनी वसवलेले गाव म्हणून शेगाव अशीही एक व्युत्पत्ती आहे. शेगाव हे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यातील गाव. ते तालुक्याचे ठिकाण आहे. संत गजानन महाराज तेथे आल्यामुळे शेगावला देशभर अफाट प्रसिद्धी मिळाली आहे. शेगाव नगरी म्हणजे शिस्त, स्वच्छता आणि सुंदर नियोजनाचे उत्तम उदाहरण...

स्थलांतरित मुलांचे शिक्षण – दौंडचा अनुभव (Education of Migrant Children -Daund’s Experience)

शालेय मुलांचे ऑनलाईन शिक्षण लॉकडाऊनमुळे 2020 मध्ये सुरू झाले, परंतु स्थलांतरित मुलांच्या शिक्षणाची मोठी अडचण निर्माण झाली. तशा मुलांच्या अनेक झोपड्या नांदूर गावात कोरोनाच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने जुलै 2020 महिन्यात दिसून आल्या. परंतु ऊसतोडीला पालकांबरोबर दिवसभर गेलेली ती मुले संध्याकाळीच माघारी येत. त्यांचे सर्वेक्षण करणे कठीण होते...

गोंधळी नाटक जपणारे चव्हाण बंधू (Kannad play in border town Wagdari)

गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते.

वागदरी येथील सूर्यनारायण मंदिर (Wagdari’s SuryaNarayan Temple)

वैशिष्ट्यपूर्ण सूर्यनारायण देवालय हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी येथे पाहण्यास मिळते. ते वास्तवात आहे शिवमंदिर, पण उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे मंदिराचे सूर्यनारायण असे नाव पडले आहे. ते मंदिर वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिराच्या खूप आधीपासून आहे. मंदिरात पुरातन शिवलिंग असून भलामोठा नंदी आहे.