Tag: सविनय कायदेभंग
सविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान
महात्माजींनी चालू केलेली कायदेभंगाची चळवळ, त्यांचा सत्याग्रह यशस्वी व्हावा म्हणून पंढरपूरातील ब्रह्मवृंदाने जाहीर अनुष्ठानास सुरुवात केली! ते अनुष्ठान साम्राज्यशाहीच्या रोषाची पर्वा न करता पंढरपूरमधील दत्तघाटावर पार पडले. गांधीजींची ती चळवळ सर्वसामान्य माणसाला किती त्याची स्वत:ची वाटत होती, याचे हे उत्तम उदाहरण! हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशी घटना तो पावेतो घडली नसावी...
थोरोच्या गावात रजनी देवधर (Rajani Deodhar in Thoreau’s Village)
मी लॉकडाऊन काळातील धावत्या नोंदींमध्ये लिहित असलेल्या काही लेखांबाबत विशेष औत्सुक्य येणाऱ्या प्रतिसादावरून जाणवते. ते प्रल्हाद जाधव याच्या 'थोरो-दुर्गा भागवत भेटी'च्या कल्पनेबाबत तसेच घडले. त्यावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या स्तरांतून वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या.