Home Tags सत्यकथा

Tag: सत्यकथा

असोशीने जगणारी व लिहिणारी लेखिका : वासंती मुझुमदार

वासंती मुझुमदारम्हणजे लेखणी व कुंचला याचा दुर्मिळ संगम असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कवितेचा उत्कट प्रतिमासृष्टी, चपखल शब्दकळा हा आत्मा आहे. त्यांच्या साहित्यात मानवी नाती व त्याचा परस्पर संबंध याचे मनोज्ञ दर्शन घडते. वासंती यांच्या कुंचल्याची कधी लेखणी होते, तर कधी लेखणीचा कुंचला होतो ते कळत नाही...

मर्ढेकर आणि लागू

कृ.द. दीक्षित यांनी आकाशवाणीमधील नोकरीदरम्यान अनेक कलावंतांना जवळून अनुभवले, त्यांच्या स्वभावातील कंगोरे टिपले. ते अनुभव त्यांनी व्यक्तिचित्रांच्या माध्यमातून आकर्षक पद्धतीने लिहून वाचकांसाठी मुक्त केले. त्यात चॉसरचे तज्ज्ञ प्रा. लागू व बा. सी. मर्ढेकर यांच्यातील तत्त्वनिष्ठा वेधक आहे…

सुसंस्कृत होण्यासाठी केलेली गुंतवणूक!

0
समाजातील छोट्यात छोट्या समुदायाची संस्कृतीसुद्धा महत्त्वाची असते. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गाने ती संस्कृती त्याच्या पदराला खार लावून घेऊन टिकवण्याची गरज आहे. तो काही स्वार्थत्याग नाही; ती असते सुसंस्कृत होण्यासाठी त्या मध्यमवर्गानेच केलेली गुंतवणूक...

सदाशिवपेठी

व्यक्तिचित्र लिहिताना त्या व्यक्तीचे गुण-दोष लेखक सांगतो, पण त्या व्यक्तीबद्दल लेखकाच्या मनात जिव्हाळा नसेल तर तो चांगले व्यक्तिचित्र लिहूच शकणार नाही. आंतरिक जिव्हाळा व तटस्थपणा हा चांगल्या व्यक्तिचित्राचा महत्त्वाचा गुण आहे. अन् तो गुण श्री.ज. जोशी, शांता शेळके यांसारख्या लेखकांच्या लेखनात प्रत्ययास येतो…

सखा कलाल – एका कथाकाराची अखेर

सखा कलाल गेले आणि पंचेचाळीस वर्षांचा स्नेह सरला. सखा कलाल स्वत:विषयी फार कमी बोलायचे, त्यामुळे त्यांची जीवनकथा त्यांच्यासमवेत गेली. त्यांचे ‘ढग’ आणि ‘सांज’ हे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले...

माझी लेखन उमेदवारी – नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar’s Effort of His First Writing)

माझे प्रकाशनासाठी पाठवलेले पहिले साहित्य म्हणजे एक कविता होती. मी वयाच्या दहाव्या वर्षी मराठी पाचव्या इयत्तेत शिकत होतो. त्या वयात प्रेमकविता लिहिण्याचे काहीच कारण नव्हते, पण लिहिली. मला तिच्यातील कल्पना आठवते. त्या कवितेत प्रेयसीचे डोळे हिरव्या चाफ्याप्रमाणे आहेत अशी नोंद होती...