Home Tags सत्ताविसावे साहित्य संमेलन

Tag: सत्ताविसावे साहित्य संमेलन

सत्ताविसावे साहित्य संमेलन (Twenty Seventh Marathi Literary Meet – 1942)

सत्ताविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे हे होते. ते संमेलन 1942साली नाशिक येथे भरले होते. अत्रे हे महाराष्ट्राचे हसते-खेळते, चैतन्यदायी, 'प्रचंड' व्यक्तिमत्त्व होय. त्यांनी वाङ्मयाचे वेड जीवनाच्या आनंदामधून आयुष्यभर जपले, जोपासले व स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा मराठी वाङ्मयावर, संस्कृतीवर, मराठी वृत्तपत्रसृष्टीवर, मराठी बोलपटांवर आणि मराठी नाटकांवर उमटवला.