Home Tags सण

Tag: सण

उपेक्षित सीतामाईचा डोंगर

मकरसंक्रातीचा सण फलटण आणि माण तालुक्यांच्या सीमेवरील सीतेच्या मंदिरात साजरा करण्याची पद्धत न्यारीच आहे ! महिला सीतेची आरती करून, मकर संक्रांतीचे सुगड तिच्या पायाशी अर्पण करून मकर संक्रातीचा सण साजरा करतात. महाराष्ट्राच्या विविध भागांतून हजारो महिला सीतेला सौभाग्याचे वाण देण्यासाठी तेथे येतात. ते सीतामाई देवस्थान सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये आहे. तो डोंगर सीतामाईचा डोंगर म्हणूनच ओळखला जातो...

दापोलीतील पिसईचा नकटा

शिमग्याच्या म्हणजेच होळीच्या सणाच्या उत्सवातील ‘पिसईचा नकटा’ दापोलीत लोकप्रिय आहे. नकटा म्हणजे देवीचा रखवालदार. नकट्याचे सोंग घेणारी व्यक्ती लाकडी मुखवटा घालते. तो मुखवटा काजूच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला असतो. तो परंपरेने चालत आलेला असतो. नकट्याचा मुखवटा पोराबाळांना भीतीदायक वाटतो...

मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा

0
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...

कालगणनेसाठी पंचांगांचा विकास (Astronomy, Astrology and Religion)

पंचांग ही भारताची संस्कृती आहे. भारतीय पूर्वज आकाश निरीक्षण करणारे, खगोल गणित जाणणारे होते. त्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून त्यांचे आयुष्य निसर्ग नियमात अधिकाधिक बसवण्याचा प्रयत्न केला. भारतीय लोकांचे धार्मिक आचरण निसर्गाच्या नियमांधारे आणि आयुर्वेदाच्या माध्यमाने जोडले गेले. परंतु धर्मशास्त्रात कालानुरूप बदल करणे गरजेचे आहे. पंचांगकर्ते, धर्मशास्त्र जाणकार, आयुर्वेद तज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यांनी एकत्रितपणे येऊन ते बदल केले व तसे सर्वांना समजावून सांगितले तर लोक त्यांचा नक्की स्वीकार करतील...

अचलपूर येथील गाढवपोळा

पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे...

महापुरुषाचा मान ! (Diwali At Rajapur)

दसरा हा सण म्हणजे नवरात्रीच्या सणाचा समारोप आणि दिवाळीच्या तयारीची सुरुवात! साधारणपणे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून ‘दिवाळीचं काय काय कसं कसं करायचं' याच्या चर्चा गावातील महिलांमध्ये सुरू होतात.
पोळ्यासाठी सजवण्यात आलेला बैल

आठवणीतला खानदेशी पोळा

जळगावाच्या भडगाव तालुक्‍यातील कोळगाव हे माझे गाव. त्या गावी श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच गावच्या दरवाज्यात एक लाकूड आणून टाकले जाई. ती प्रथा कालांतराने बंद पडली. पूर्वीच्या मानानं बैलांची संख्या खूप कमी झाली आहे. पण पोळा हा सण आला की त्या आठवणी आपोआपच नजरेच्या समोर येतात...