Tag: संत नामदेव
महाराष्ट्र भूषण धर्माधिकारी पितापुत्र
प्रसिद्ध निरूपणकार आप्पा धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला. देशपातळीवर जसा ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे तसाच राज्य पातळीवर महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आहे. धर्माधिकारी कुटुंबीयांचे प्रेरक आणि समाजोपयोगी कार्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्याच कुटुंबासाठी पित्यापाठी पुत्राला असा हा दुसऱ्यांदा पुरस्कार दिला आहे...
ऐतिहासिक वारसा असणारे मुंगी गाव
गोदावरी नदीकाठी गोदा संस्कृतीचा उदय झाला व तेथे अनेक गावे वसली. त्या गावांना धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक महत्त्व आहे. मुंगी गाव त्यापैकी एक. त्याच्या एका बाजूला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांचे पैठण, तर दुसऱ्या बाजूला संत शिरोमणी ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान आपेगाव आहे. मुंगी गावाला पूर्वीच्या काळी पैठण शहरासारखे महत्त्व होते...
मंदिर प्रवेशाचे महाभारत – संजयाच्या भूमिकेत
साने गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीतील अखेरचा आणि निर्णायक लढा पंढरपूरमध्ये लढला गेला. देवतांची मंदिरे म्हणजे सनातन्यांचे बालेकिल्ले. त्या चळवळीत ते बालेकिल्ले काबीज करून, त्यांचे दरवाजे अस्पृश्यांना खुले करण्यास महत्त्वाचे स्थान मिळाले. साने गुरुजी यांनी त्यासाठी प्राणांतिक उपोषण केले. त्यातून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रवेशाचे महाभारत घडले व त्याची परिणती हरिजनांना मंदिर प्रवेश मिळण्यात झाली...
निळोबारायांची अभंगार्तता
ज्ञानदेवांनी जी भक्ती कल्पना मांडली, संत नामदेवांनी ज्या भक्तीचा प्रसार पंढरी ते पंजाबपर्यंत केला, तुकोबांनी ज्या भक्तीचे गोडवे गायले; निळोबांनी त्याच भक्तीचा प्रसार पुढे, दोन शतकांनंतर केला. देव आणि भक्त एक होऊनही भक्तीच्या सुखासाठी वेगवेगळे राहतात ही अद्वैतातील भक्तीची त्यांची कल्पना. त्या भक्तीमुळे आत्मज्ञान प्राप्त होते असा साऱ्या संतांचा अनुभव आहे...
व्यंकटेश स्तोत्र : एकशेआठ ओव्यांची विष्णुपूजा
व्यंकटेश स्तोत्र आहे अवघ्या एकशेआठ ओव्यांचे. ते देविदासाने रचले. देविदास स्वतः त्या रचनेला ‘प्रार्थनाशतक’ असे म्हणतो. त्यांतील पहिल्या पाच ओव्या या नमनाच्या आहेत. नमन आहे गणपती, सरस्वती, देविदासाचे गुरू, संत व मुनिजन आणि साक्षात श्रोते यांना. तसेच, अखेरच्या सात ओव्या या स्तोत्राची महत्ता सांगणाऱ्या आहेत...
माझे जीवन गाणे (My Life Story- Principal Vishwas Patil)
माझा जन्म एका शेतकरी परिवारात झाला. माझे वडील इयत्ता चौथीपर्यंत शिकलेले. आईने तर शाळेचा उंबरठाही ओलांडलेला नव्हता. तरीही माझे बालपण एका भावसमृद्ध वातावरणात गेले. मला माझे बालपणीचे चित्र आठवते...
मराठी नाटकाची पूर्वपरंपरा (Marathi Stage has long tradition)
नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
संजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र (Sanjay Nahar)
संजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात...
भारूड
संतांनी सर्वसामान्य लोकांना अध्यात्माची शिकवण सोप्या भाषेत देण्यासाठी ओवी, अभंग, भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यांतील रूपकात्मक आणि जनसमुदायासमोर नाट्यमय रीतीने सादर केली जाणारी...
नामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना
वारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप...