Tag: संत तुकडोजी महाराज
सातपुड्यातील लोकउत्सव – बहिरम यात्रा
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...
दावलवाडी : जालना-बदनापूर जवळची संपन्नता
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...
राजा-रेणू दांडेकर – चिखलगावचे ध्येयप्रेरित जोडपे
राजा दांडेकर हे दापोली तालुक्यातील चिखलगावचे. त्यांनी शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे ठरवले होते. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी लोकसाधना संस्थेच्या माध्यमातून शाळा काढली. तेथे शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल असा प्रयत्न असतो...
गाईगोधन परंपरेचे हनवतखेडा
हनवतखेडा हे अचलपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर वसलेले टुमदार असे गाव आहे. गावाच्या मधोमध असणारे नागद्वार मंदिर संस्थान, नदीपलीकडे असणारे दत्तझिरी मंदिर प्रसिद्ध आहे. गावातील उत्तम शरीरसौष्ठव व उत्कृष्ट सजावट असणाऱ्या गार्इंच्या मालकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते...
करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर
मेळघाटच्या मुखावरील वैराण मुलुखात आयुष्याचे वाळवंट झालेल्या अंध-अपंग-मूकबधिर-मतिमंद-विमनस्क वेड्यांच्या जीवनात नंदनवन फुलवण्याचा प्रयत्न गेल्या वीस वर्षांपासून एक वेडापीर करतोय, पंचक्रोशीतील लोक त्या वेड्यापीरास शंकरराव पापळकर या नावाने ओळखतात...