Home Tags शिवाजी विद्यापीठ

Tag: शिवाजी विद्यापीठ

उमर खय्यामची फिर्याद

‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…

जगताप सरांचा भर प्रशिक्षणाच्या गुणवत्तेवर! (Educationist H.N. Jagtap Emphasizes on the Quality Training in...

ह.ना. जगताप हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांचा भर अध्यापक महाविद्यालये शिक्षक निर्मितीचे कारखाने न बनता, त्यातून धडपड्या विद्यार्थी हे दैवत मानणारे आणि अभ्यास व वाचन प्रचंड असणारे शिक्षक घडले पाहिजेत, त्यासाठी गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण व शिक्षणपद्धत यावर आहे. जगताप यांनी शिक्षक-प्रशिक्षणातील सूक्ष्म अध्यापन, मूल्यमापन पद्धत, मानसशास्त्र व संशोधन पद्धत यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे…

कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास

जी.पी. माळी यांचे ‘कोल्हापूरची शतपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे...

सावंताचे सौरघट संशोधन – कोल्हापुरातून कोरियात झेप ! (Kolhapur boy Sawanta in solar energy...

8
सावता माळी पंढरपूर संतपीठाजवळच्या अरण गावचे. त्यांनी संत परंपरेत असाधारण स्थान मिळवले. तसा सावंता माळी हा कोल्हापूरजवळच्या शिवाजी विद्यापीठाचा तरुण स्नातक. तो जगातील सौर संशोधन क्षेत्र गाजवून राहिला आहे.