Tag: शिर्डी
शांतीचा कल्पवृक्ष श्री संत रामजी महाराज (Ramji Maharaj- Saint from Vidarbha)
शांतीसागर श्री संत रामजी महाराज नावाचे साधू पुरुष अमरावती जिल्ह्यात बग्गी (जावरा) या गावी होऊन गेले. त्यांना शांतीचा कल्पवृक्ष म्हणत. त्यांनी सर्व जाती-धर्माच्या लोकांना समानतेची शिकवण दिली, त्यांनी आमलोकांमध्ये आध्यात्मिक व नैतिक मूल्यांची बीजे रोवली हे त्यांचे खास वैशिष्ट्य...
ऊसतोडणी कामगार महिलांची गर्भाशये का काढली जातात?
स्त्रीची मासिक पाळी महिन्यातून साधारणपणे एक वेळा किंवा कधी दोन वेळा येत असल्याने तशा महिला महिन्यातून साधारण दोन ते तीन दिवस तरी काम करू शकत नाहीत. मासिक पाळीमध्ये महिलांची गैरसोय अतिशय होते. ती कुटुंबे ऊसतोडणीच्या ठिकाणी पाले ठोकून राहत असतात. त्यांना संडास-बाथरूमची सोय नसते. शिवाय रोजगार तर बुडतो आणि वरून दंडही भरावा लागतो. त्यामुळे अनेक महिला त्यांची ऑपरेशन करून घेऊन गर्भाशये काढून टाकतात. वंजारवाडी गावात पन्नास टक्के महिलांनी गर्भाशये काढल्याचे आढळून आले आहे...